सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेना मी आणली होती. त्यामुळे भाजपत प्रवेश केल्यास कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
सावंतवाडीत राणेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी नारायण राणेंनी भाजपमध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
भाजपप्रवेश कधी होईल ते आता सांगू शकत नाही. पण येत्या आठ दिवसात भाजपप्रवेश होईल, अशी माहिती नारायण राणेंनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना कार्यकर्ते माझ्यासोबत आले, काँग्रेस सोडून पक्ष काढला तेव्हाही माझ्यासोबत आले, त्याचप्रमाणे आता भाजपमध्ये जाताना देखील कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपत येतील, असं राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
खडसे पहिल्या रांगेत बसले पण भाषणाचा मान काही मिळाला नाही! https://t.co/FAReS6jVl0 @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला अन् मराठवाड्यात धोधो पाऊस बरसला” – https://t.co/ny1skBeQyi @dhananjay_munde @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
मी जाती-पातीत न बसणारा, तरी मोदींनी मला मुख्यमंत्री केलं- देवेंद्र फडणवीस- https://t.co/fTFWKQ6Ns3 @Dev_Fadnavis @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019