पुणे | मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच केंद्रीय मंत्री झालो, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायणे राणे(Narayan Rane) यांनी केलं आहे.
नारायण राणेंनी पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना राणेंनी आपल्याला मंत्रिपद कसं मिळालं यावर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भाजपमध्ये आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे.
दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर पासून सुरुवात केली. त्यानंतर आसाम आणि अनेक राज्ये फिरलो. माझ्या आठ नऊ महिन्यांच्या काळात आठ ते नऊ राज्य फिरत पुण्याला आलो आहे, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे.
दर महिन्याला पुण्याला येणारा माणूस आज चार महिन्यानंतर पुण्याला आला. आणि त्याला कारण व्यासपीठावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण आता आनंद आहे, आम्ही आता मित्र आहोत. त्यांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं त्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेते पद सांभाळलं, असं नारायण राणे म्हणालेत.
नारायण राणेंनी यावेळी बोलताना मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात फार आंदोलन झाली, विरोधी पक्षांनीही तेव्हा भारतीय जनता पक्षावर, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फार टीका केली, असं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हे घटनेत बसत नाही, आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा यासारख्या अनेक मागण्या विरोधकांनी लावून धरल्या होत्या. तेव्हा मी महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील तज्ज्ञांशी चर्चा केली, असंही नारायण राणेंनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला BJP कडून केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
“सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरुये”
महाराष्ट्रात Lockdown लागणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य…
Omicron | ‘कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…’; धक्कादायक माहिती समोर
“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”