“आमचं घर दिसत मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही”

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात असून त्यांना योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15  दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. तसं न केल्यास 15 दिवसानंतर त्यांच्या बंगल्यावर कारवाई होऊ शकते.  भाजप, केंद्रीय मंत्री, नारायण राणे, शिवसेना, घर, कारवाई, कागदपत्रे

माझ्या घरात मला सर्व अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर मी घरात प्रवेश केला आहे. बेकायदेशीर असं काहीच नव्हतं. तरी यांनी नको ते कारण देत नोटीस दिली. आम्ही ते नियमित करण्यासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र हे राजकारण आहे. कायदेशीर कारवाई नाही, असं नारायण राणेंनी म्हटलंय.

महापालिका आयुक्तांना एकच माझंच एक घर दिसतंय. इतर ठिकाणी फिरताना ते डोळे झाकून फिरतात. मुख्यमंत्रीही तसेच. ही सुडाची कारवाई असून देशात लोकशाही आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ते म्हणालेत.

राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे, त्याचं मी समर्थन करतो. भोंग्याला विरोध नाही मात्र बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते म्हणाले आहेत. मग बेकायदेशीर भोंगे का ठेवावेत. आमचं घर अनधिकृत यांना दिसतं, मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही, असं राणे म्हणालेत.

मातोश्रीजवळील अनेक बांधकामंही बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील बेहरामपाडा हा पूर्ण बेकायदेशीर आहे. मात्र तिथे हात टाकायची सरकारची हिम्मत नाही आहे, असं राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘राज्यातील वातावरण बिघडवाल तर…’; वळसे-पाटलांचा गंभीर इशारा

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी