मुंबई | एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण लागलं. शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.
नाराज एकनाथ शिंदेंना समजवण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आले. मात्र, शिवसेनेचे सगळे प्रयत्न फेल गेले.
शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरत येथे जाऊन शिंदेंची भेट घेतली मात्र तरीही त्यांचं मन वळवण्यात यश आलं नाही. उलट शिंदे गटात सामिल होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामागे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकारचं भविष्य धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हावं यासाठी संजय राऊत आग्रही होते. तर शिवसेनेनं भाजपसोबत युती करावी असं ठाम मत अजूनही एकनाथ शिंदेंचं आहे.
शिवसेनेत आता मोठी फुट पडली असून भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सर्व घडामोडींवरून संजय राऊतांवर खोचक शब्दात टीका केली आहे.
संजय राऊत खुश. कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली आहे.
दरम्यान, कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कारस्थानं असल्याचा टोला देखील नारायण राणेंनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू’, नवनीत राणांची खोचक टीका
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द
“…तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”
‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा