मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्यांना यश येत नसल्याचं दिसत नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर आमदारांना इशारा दिला.
बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा इशाराच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला. आता पवारांच्या या वक्तव्याचा भाजप नेते नारायण राणे यांनी समाचार घेतला आहे.
पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, शरद पवार साहेब शिंदे गटाला धमक्या देत आहेत. सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठिण होईल, असं नारायण राणे म्हणालेत.
आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेलं सरकार आहे, त्यामुळे कामाच्या आणि कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणं शोभत नाही, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले…
“एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपच, अजित पवारांना माहिती नाही”
‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट
‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?
‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर