महाराष्ट्र मुंबई

“नारायण राणे या मतदारसंघातून लढणार”

सिंधदुर्ग : भाजपचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर पोहचलेले नारायण राणे आता विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. 

2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नारायण राणे विधानसभा निवडणूक लढतील, असं नितेश राणेंनी स्पष्ट सांगितलं. 

नितेश राणेंनी कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नारायण राणे हेच आगामी उमेदवार असतील, असं सांगत तूर्तास इतर चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

2014 ला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. नारायण राणे पुन्हा राज्यात येणार का? या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. ते निवडणूक लढणार असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे. 

काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. मात्र ते भाजपमध्ये न जाता त्यांनी स्वतंत्र ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाची स्थापना केली. भाजपने त्यांना पाठिंबा दिल्याने ते राज्यसभेवर पोहचले. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळेल असंही बोललं जात होतं. 

शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणेंना दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं होतं. मात्र आता महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाने विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केल्याचं सांगितलं जातंय. 

महत्वाच्या बातम्या-

-दोघी खुदकन हसल्या अन् टेबलामागे दडल्या; सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु

-मोबाईल तसेच लॅपटॉपवर ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

-रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

-‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं

-काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर; हे 13 दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर

IMPIMP