मी नक्की कुठे??? निर्णय येत्या 10 दिवसात- नारायण राणे

मुंबई : मी भाजपमध्ये जाणार की स्वत:चा पक्ष चालवणार याबाबतचा निर्णय येत्या 10 दिवसात घेण्यात येईल. काँग्रेस सोडताना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी मला काही आश्वासनं दिली होती. ती आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत, असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

भाजपने दिलेल्या आश्वासनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार-पाच दिवसात मला सांगतील. त्यानंतर मी भाजपमध्ये असेल की महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असं नारायण राणे म्हणाले आहेत. 

अमित शहांनी आपल्याला प्रवेशासाठी मंजूरी दिली असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं आहे. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याची वाट पाहतोय. प्रतिक्षेला मर्यादा असतात, असंही नारायण राणे म्हणाले आहेत. 

विधानसभा निवडणूकीत नितेश राणे काँग्रेसकडून उमेदवार म्हणून लढणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, नारायण राणे भाजपमध्ये जाणार की स्वत:च्याच पक्षात राहणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-कसोटीला मालिकेला आजपासून सुरूवात; सलामीला कोण?

-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!

-राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे रवाना

-गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचं बाळा नांदगावकरांना आवाहन

-मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात