नारायण राणेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा आहे- देवेंद्र फडणवीस

धुळे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा आहे. येत्या आठवडाभरात राणे हा मोठा निर्णय घेणार आहेत. खुद्द राणे यांनीच हे भाष्य केलं आहे, असं गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राणेंना त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

मला नारायण राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत जाणं मला शक्य झालं नाही. राणे आमच्या सोबतच आहेत. त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय माझ्याशी चर्चा करुनच घेतला आहे. त्यांना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मला राष्ट्रवादीची आणि काँग्रेसचीसुद्धा ऑफर आहे. मात्र ऑफिसियली भाजपमध्ये प्रवेश करायचा की दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचं हे मी येत्या 8 दिवसांत ठरवणार आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत. 

मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितंल आहे.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेेंच्या भाजपप्रवेशाबाबत बोलताना उदयनराजेे पक्षात आले तर आनंदच होईल, आम्ही त्यांचे स्वागत करु, असंही फडणवीस यावेळी म्हणाले

दरम्यान, आमची परीक्षक जनता आहे. आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु याचा जनेतला विश्वास वाटतो. त्यामुळे भाजपच पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या-