उद्धव ठाकरेंबाबत नारायण राणेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. सामनाला दिलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक रोखठोक प्रश्नांची उत्तरं दिली.

या महामुलाखतीवर भाजप व मनसेच्या अनेक नेत्यांनी टीका केली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे कसे मागे राहणार? उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर नारायण राणे यांनी थेट पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे.

बाळासाहेबांचं नाव घेण्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरेंच्या परवानगीची गरज नाही. तर उद्धव ठाकरे अत्यंत कपटी असल्याची टीका देखील नारायण राणेंनी केली.

उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवताना नारायण राणेंनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे घरातून पळून गेले असल्याचा सर्वात मोठा दावा नारायण राणेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी वडिलांना ताप आणि संताप दिला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वास्थ्य बिघडण्यामागचं कारण उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे दोन वेळा घरातून पळून गेले होते, असा खळबळजनक दावा नारायण राणेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना आठवत असेल तर विचारा त्यांना दोन वेळा कोणी परत आणलं? त्यांना दोन वेळेला या नारायण राणेंनी परत आणलं आणि आमचं घर तोडायला हा निघाला आहे, असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला.

दरम्यान, राणेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. तर उद्धव ठाकरेंविरोधात तुफान बॅटींग करताना राणेंनी राऊतांवरही निशाणा साधला आहे. राऊतांमुळे हे सरकार कोसळलं असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”

नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’

शिवसेनेतच फूट का पडते?, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण