“जयंत पाटील भाजपमध्ये येणार होते”; केंद्रीय मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात सध्या धार्मिक मुद्द्यांवरून राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं आहे.

राज ठाकरेंनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपले अयोध्या दौरे जाहीर केले आहेत.

मनसेच्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेनं टीका केल्यानंतर शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर राणेंनी टीका केली आहे. सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेनं हिंदूत्वाचा उपदेश देऊ नये, असं राणे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना भाजपशी सोबत करावी वाटली तर त्यात गैर काय आहे, कोणालाही कोणाची सोबत करावी वाटेल, कोणीही कुणाच्या सुरात सुर मिसळू शकतं, असं राणे म्हणाले आहेत.

आम्ही कसं वागायचं हे आता मुख्यमंत्री सांगणार का?, आम्ही तसं वागणार नाही. स्वत: गद्दारी करणारे दुसऱ्यांना सांगणार का?, असा सवाल राणेंनी शिवसेनेला केला आहे.

सध्यातरी संजय राऊत यांनी  बोलू नये, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांच्यामागं चौकशी लागल्यानंतर ते काहीपण बोलत आहेत, अशी टीका राणेंनी राऊतांवर केली आहे.

जयंत पाटील हे निवडणुकीआधी भाजपमध्ये येणार होते. परिणामी काही बोलू नये, असा गौप्यस्फोट राणेंनी केली आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार चर्चा होत आहेत.

दरम्यान, राणेंनी थेट पाटील यांनाच निशाण्यावर घेतल्यानं आता जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. 2019 विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय स्थलांतर झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”