मुंबई : खासदार नारायण राणे यांचा बहुचर्चित भाजप प्रवेश अजूनही झालेला नाही. पण त्याअगोदर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मात्र राणेंना लक्ष्य केलंय. शिवसेना आणि भाजपच्या युतीला नारायण राणेंचा फायदा होईल की तोटा हे लोकांना आता माहित आहे, असं शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पाच आमदार आहेत, फक्त कणकवलीत स्वाभिमान पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे ज्यांना नारायण राणे प्रभावी आणि जनाधार असलेले नेते वाटत असतील त्यांनी त्यांची परीक्षा घेऊन पाहावी, असं विनायक राऊत म्हणाले.
राणेंना भाजपमध्ये घेण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे का यावरही राऊतांनी स्पष्टीकरण दिलं. केवळ शिवसेनेच्या विरोधाची ढाल पुढे करणं योग्य नाही, भाजपला नारायण राणेंना पक्षात घ्यायचं आहे की नाही हे एकदाच त्यांनी स्पष्ट करावं, किंवा फक्त नारायण राणेच म्हणतायत की मी जाणार आहे… मी जाणार आहे आणि भाजपला त्यांना घ्यायचं नाही? या जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा नारायण राणेंना पक्षात घेण्यास विरोध आहे आणि ते दुर्लक्षित करून चालणार नाही, अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली.
दरम्यान शिवसेनेचं महाराष्ट्रातलं प्राबल्य वाढत चाललेलं. म्हणून त्यांची शिवसेनेत यायची इच्छा झालेली आहे. अर्थात त्यांना पक्षात घेणं न घेणं हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब योग्य वेळी निर्णय घेतील, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“वंचित आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल” – https://t.co/VjS0VuaaAQ @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ चार दहशतवाद्यांवर होणार कारवाई! – https://t.co/iZCQsnnBEn @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
जागावाटपावरुन मोदींनी दिल्या पक्षातील नेत्यांना ‘या’ सूचना! – https://t.co/cGy3QGxJiU @narendramodi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019