नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन चर्चेत असतात. सध्या ते मुंबईतील बंगल्याविषयी अडचणींत सापडले आहेत.

मुंबईतील नारायण राणेंच्या अधिश बंगल्याप्रकरणी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती.

नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

कालच अधिश बंगल्याप्रकरणी आता नारायण राणेंना मोठा दिलासा मिळाला होता. मुंबई पालिकेने दिलेली नोटीस मागे घेतली होती.

आता या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जुहू येथील अधिश बंगला पुर्णपणे पाडण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे.

बंगल्याचं 100 टक्के कायदेशीर काम केलं आहे. मनापानं सर्व मंजुरी दिलेल्या आहेत, असं राणे यांना पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…” 

  1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

  मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी

  “आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार