नवी दिल्ली | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.
मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे.
सचिन वाझे यांच्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते सरकारला कोडींत धरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ह.ल्लाबोल केला आहे.
यावेळी नारायण राणे यांनी सचिन वाझे प्रकरणात एक अनोखी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आधी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली असल्याची समजतं आहे.
सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतलं. त्याचबरोबर त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटीची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच सचिन वाझे पोलीस दलात परत आले आहेत. यावरुन मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसून येतं आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
यापूर्वी नारायण राणे यांनी सचिन वाझे प्रकरणात अशाच प्रकारची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. माझ्या मते सचिन वाझे यांचा पुर्वोतिहास पाहता त्यांना पोलिस खात्यात परत घेणं. तसेच मनसुथ हिरेण आणि अन्य ह.त्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
याच पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-