मुंबई : आज माझे जे काही कौतुक होते आहे त्याचे सर्व श्रेय बाळासाहेबांनाच जाते. कणकवलीतील वरवडे गावचा एका गिरणी कामगाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तो या राज्याचा मुख्यमंत्री बनला. मी शिवसेनेत असताना कधीच पदे मागितली नाहीत. शाखाप्रमुख, मंत्री, मुख्यमंत्री ही सगळी पदे बाळासाहेबांनीच दिली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.
खासदार म्हणून मी माझ्या मर्जीने दिल्लीत गेलो नाही, महाराष्ट्रात अजून काहीतरी करण्याची इच्छा होती. राज्यासाठी आणखी काहीतरी करण्यासाठी अजून थोडा काळ संधी मिळेल, असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मात्र तसे न होता आता माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ वाया जातो आहे याचे दुःख माझ्या मनात आहे, मला मुख्यमंत्री झाल्यानंतर मित्र कमी आणि शत्रूच जास्त निर्माण झाले, अशी खंत नारायण राणे यांनी बोलून दाखवली.
नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते, ‘No Holds Barred’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
मी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर पुस्तके लिहिण्याचाच संकल्प केला होता. पण काय करू परिस्थिती मला निवृत्त होऊ देत नाही. कणकवलीतील वरवडे गावचा एका गिरणी कामगाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तो या राज्याचा मुख्यमंत्री बनला. यातून तरुणांना काही तरी शिकायला मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले, असं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राणे बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
-बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर
-वडिल 9 वेळा काँग्रेसचे खासदार, ‘या’ नेत्याची आमदार मुलगी करणार शिवसेनेत प्रवेश???
-देशहिताच्या आड धर्म येता कामा नये!;’एक देश, एक संविधान’ भूमिकेचं ठाकरेंनी केलं स्वागत
-इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!
-“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे झकलण्याची गरज नाही”