पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन संपन्न

नवी दिल्ली | भारत देशाला आज जुलूम आणि गुलामीतून मुक्त होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देशात 75 वा स्वतंत्र दिन (Independence Day of India) आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.

दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी तिनही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी ध्वजवंदन केले.

या वेळी देशाच्या राजधानी दिल्लीत देशाच्या सर्व भागातून लोक आले आहेत. त्यांना उद्देशून पंतप्रधान भाषण देत आहेत. देशाच्या अमृतमोहत्सवाचा उत्साह  संपूर्ण देशात भरुन राहिला आहे.

यावेळी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारतात विविधतेत एकता आहे, असे सांगितले आहे. मोदी यांनी यावेळी देशाच्या स्वतंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या सुपत्रांना आदरांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका

“त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची संख्याबळाच्या मुद्यावर भविष्यवाणी

“सरकारी नोकरीसाठी मुलींना कुणाच्यातरी सोबत झोपावे लागते, तर मुलांना…” काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य….

शिंदे गटाची पहिली शाखा उघडली, खासदारांच्या हस्ते उद्घाटन

प्रति शिवसेनाभवन बांधण्यावरुन उदय सामंतांचे स्पष्टीकरण