“स्वतंत्र्य भारतात जन्माला आलेला मी पहिला…” – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | इंग्रज, असंख्य संस्थाने आणि राजे रजवाडे यांच्या बंधनातून आणि गुलामीतून मुक्त होऊन आज भारत देशाला 75 वर्षे पूर्ण झाली. देशात 75 वा स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव दिन (75th Anniversary of Independence of India) मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

आज स्वतंत्र्य दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर (Red Fort) देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी त्यांनी देशाला उद्देशून भाषण दिले. देशाच्या स्वतंत्र्यासाठी स्वत:चे प्राण वेचणाऱ्या असंख्य भारतीय वीर आणि मातांना त्यांनी आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदी स्वतंत्र्य भारतात जन्मास आलेले आणि ध्वजारोहन करणारे पहिले पंतप्रधान आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. देशात शांतता आणि एकता टिकवून ठेवण्यात देशाचे भले असल्याचे मोदी म्हणाले.

यावेळी देशाच्या विविध भागातून स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या प्रसंगी अनेक नागरिक राजधानी दिल्लीत दाखल झाले. देशाला मोठा दैदिप्यमान इतिहास आहे आणि आज या देशाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबद्दल मोदींनी देशाला शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या –

पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन संपन्न

शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका

“त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची संख्याबळाच्या मुद्यावर भविष्यवाणी

“सरकारी नोकरीसाठी मुलींना कुणाच्यातरी सोबत झोपावे लागते, तर मुलांना…” काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य….

शिंदे गटाची पहिली शाखा उघडली, खासदारांच्या हस्ते उद्घाटन