मुंबई | राज्यातील अनेक अंधश्रद्धेच्या प्रथांना आपल्या वैचारिक ताकतीनं समाजापासून लांब ढकलणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर आता त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील वाद वाढत आहेत.
नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेंच्या माध्यमातून राज्यात एक सामाजिक विचार पेरला होता. अंनिसच्या माध्यमातून दाभोळकरांनी राज्यभर कार्यकर्त्यांचं जाळ तयार केलं होतं.
दाभोळकरांच्या निधनानंतर संस्थेमध्ये अनेक प्रकारचे वाद वाढले आहेत. अंनिसचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर अंनिसमधील कोट्यावधींच्या वादाला आता सुरूवात झाली आहे.
नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमीद दाभोळकर आणि मुलगी मुक्ता दाभोळकर यांनी पाटील यांच्या निधनानंतर 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतला आहे, असा आरोप संस्थेचे अविनाश पाटील यांनी केला आहे.
हमीद-मुक्ता यांच्या गटातील 5-10 लोक संस्थेच्या कसल्याही पदावर नसल्याचंही अविनाश पाटील यांनी म्हटलं आहे. हा एन. डी. पाटील यांच्या निधनाच्या काही दिवसांत सुरू झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
आम्ही एन. डी. पाटील यांच्या निधनाच्या दु:खातून सावरत आहोत परिणामी अध्यक्ष निवडीचा सध्या संबंध नाही, असं अविनाश पाटील म्हटलं आहे. पाटील यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.
दाभोळकरांच्या हत्येनंतर राज्यात तसेच देशात अंनिसचं काम दुप्पटीनं वाढलं आहे. हमीद आणि मुक्ता दाभोळकरांनी संस्थेच्या विरोधात काम केलं आहे. एक समांतर पद्धत ते चालवत आहेत, असंही अविनाथ पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, एन. डी. पाटील हे अंनिसचे संस्थापक अध्यक्ष पदावर आजतागायत कार्यरत होते. परिणामी त्यांच्या निधनानंतर आता अंनिस राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे
श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये