मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ सूचना; शिवसेनेचं टेंशन वाढणार?

मुंबई | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काही दिवसांतच निवडणूक आचारसहिंता लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोणत्या अटींवर युती करायची याबाबत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही, अशा थेट सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे.

मोदींच्या या सूचनांनंतर जागावाटपात भाजपने आक्रमक भूमिका घेत जास्त जागांची मागणी केल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-