देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन; तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन चर्चा केली आहे. यावेळी तिन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूच्या संकटावर फोनवरुन चर्चा केली.

महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची संख्या सातत्याने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

अमित शहा यांनी शरद पवार यांना फोन करुन राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेत उपाय योजनांवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना नियंत्रणासाठी अनेक महत्त्वाच्या सुचनाही केल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 690 वर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला”

-भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

-काँग्रेस नेते नसीम खान यांचं तबलिगींबाबत मोठं वक्तव्य!

-रामदास आठवलेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

-‘माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या’; दिवे पेटवण्यावरून कुमारस्वामींनी दिलं मोदींना आव्हान