“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे घुसखोर”

नवी दिल्ली | एनआरसीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे घुसखोर असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना अधीर रंजन चौधरी यांनी ही टीका केली आहे.

हा देश सर्वांचा आहे. हा देश कुण्या एकट्या व्यक्तिच्या मालकीचा नाही. इथे सर्वांना समान अधिकार आहे, असं सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही घुसखोर आहेत. तुमचं घर गुजरातमध्ये आहे आणि तुम्ही दिल्लीत आला आहात. तुम्ही स्वत: स्थलांतरीत आहात, अशी जोरदार टीका रंजन चौधरी यांनी केली आहे.

समाजात गरीब, आदिवासी, अशिक्षित आणि मागास लोक आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही. त्यांच्याकडे कसली आलीत कागदपत्रे? आजचा दिवस कसा जाईल? दोनवेळंचं अन्न कसं मिळवता येईल, याची त्यांना भ्रांत असते. ते लोकही आज भयभीत झाले आहेत, असंही रंजन चौधरी यांनी सांगितलं आहे.

भाजपला मुसलमानांना पळवून लावू हे दाखवून द्यायचं आहे. पण मुसलमानांना पळवून लावण्याची त्यांची हिंमत नाही. मुसलमान हे या देशातील नागरिक आहेत. ते का म्हणून पळून जातील?, या देशात हिंदू-मुस्लिम सर्व समान आहेत, असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-