नवी दिल्ली | नवीन वर्षात केंद्र सरकारच्या वतीनं मोठ्या घोषणा व्हायला आता सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं नवीन वर्षातील पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला आहे.
शेतकरी सन्मान योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात आला आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं ही योजना नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात चालू केली आहे.
देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रूपयांचा हप्ता जमा झाला आहे. नवीन वर्षात मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले आहेत.
2021 या वर्षात केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या अभूतपुर्व आंदोलनाचा सामना करावा लागला होता. शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता.
तीन केंद्रीय कायद्याविरोधातील आंदोलनात 700 हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांनतर ते कायदे मागं घेण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता.
केंद्रीय कृषी कायद्याच्या आंदोलनानं सरकारच्या प्रतिमेला तडा गेला होता. तीच प्रतिमा व्यवस्थित करण्यासाठी मोदी सरकार या नवीन वर्षात प्रयत्न करणार आहे.
देशात सध्या 86 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचीच परिस्थिती सुधारण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे, असंही केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा फायदा राज्यातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे. यासाठी 2 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचं कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उद्यास आलेल्या या योजनेचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यत दहा हफ्ते झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती
गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त