देश Top news

संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी

narendra modibjp 3

नवी दिल्ली | संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधून सरकारची भूमिका व्यक्त केली.

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

भविष्यात संसदेचं मूल्यमापन करताना संसद कशी चालवली आणि किती चांगलं योगदान दिलं गेलं याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. कोणी किती विरोध केला आणि जोर लावला हे मूल्यमापनाचे मानदंड असू शकत नाही. संसदेत किती तास काम झालं. कोणत्या विषयावर काम केलं हे महत्वाचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

गेल्यावेळी कोरोनाचं संकट होतं. त्यावेळीही अधिवेशन घेतलं. त्यानंतर सरकारने कोरोना रोखण्यासाठी विशेष काम केलं. देशाने 100 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं, असं त्यांनी सांगितलं.

आपण 150 कोटींच्या जवळ जात आहोत. आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलंय.

संसदेत सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाविरोधात जेवढा आवाज बुलंद करायचा तेवढा करा. पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तरुणांना आदर्श मिळेल असं वर्तन करा. या अधिवेशनात सकारात्मक आणि सचेत कार्य झलं पाहिजे, असं ते म्हणाले.

देशात चारही दिशांमध्ये रचनात्मक, सकारात्मक आणि जनहितासाठी राष्ट्रहितासाठी सामान्य नागरिक अनेक कार्यक्रम करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी पावलं उचलत आहे, असंही मोदींनी सांगितलं.

स्वातंत्र्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिकही कोणती ना कोणती जबाबदारी पार पाडत आहे. या गोष्टी देशाच्या उज्वल भविष्यासाठी शुभ संकेत आहेत. काही दिवसांपूर्वी संविधान दिवसही नव्या संकल्पनेसह उत्साहात साजरा करण्यात आला, असं मोदी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या… 

“महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम, पब, पार्टी, पेग आणि पेंग्वीनमुळे झाली” 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं”