भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे- नरेंद्र मोदी

न्यूयॉर्क : आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या सत्रात बोलत होते.

दहशतवाद कोणत्याही एकाच देशासमोरीलच नाही तर संपूर्ण जग आणि मानवजातीसमोरचे आव्हान आहे. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एक होण्याची गरज आहे, असंही मोदींनी सांगितलं.

भारत हजारो वर्षांपूर्वीची एक महान संस्कृती आहे. ज्याची स्वतःची एक विशिष्ट परंपरा आहे. जो जागितक स्वप्न बाळगून आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

लोकांच्या सहभागातून लोकांचे कल्याण हे आमचे मुळ तत्व आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. आजचा हा क्षण यासाठी देखील महत्वाचा आहे कारण, यावर्षी संपूर्ण जग महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहे. सत्य आणि अहिंसेचा त्यांनी दिलेला संदेश आजही जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असंही मोदींनी सांगितलं.

दरम्यान,  2020 पर्यंत आम्ही गरिबांसाठी आणखी दोन कोटी घरांची व्यवस्था करणार असल्याचं सांगत, 2025 पर्यंत भारतला टीबी मुक्त करण्यासाठी काम करत असल्याचंही मोदींनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-