संसदेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले “टुकडे टुकडे गँगची लीडर…”

नवी दिल्ली | अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.

उज्वला योजनेबद्दल मोदी बोलत असताना अधीर रंजन चौधरी विरोधी बाकावर बोलत होते.लोकसभा अध्यक्ष त्यांना थांबवत होते त्यावरून मोदींनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली.

दादाला थांबवू नका, त्याला बोलू द्या कारण एवढ्या वयानंतरही ते बालपण एन्जॉय करत आहेत, अशी टीका मोदींनी यावेळी केली. तामिळनाडू, केरळनं तुम्हाला स्वीकारलेलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते.

यावर नरेंद्र मोदींनी काँग्रेसला नागालँड, त्रिपुरा, तामिळनाडूसारख्या अनेक राज्यांनी किती वर्षांपासून नाकारलं आहे याचा पाढा संसदेत वाचला. कोरोना काळात विरोधी पक्षाचे नेते मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना घेऊन गप्पा मारत होते, असा टोला देखील त्यांनी यावेळी राहुल गांधींना लगावला.

आम्ही जे केलं ते आमच्या बुद्धीनुसार केलं, देवानं जेवढी दिली आहे त्या समजेनुसार, पण त्यात समर्पणाची ताकद अधिक होती, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

सरकारच भाग्यविधाता ही आपल्या देशाची मानसिकता बनली आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या सामर्थ्याचंही नुकसान झालंय, असंही मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेस टुकडे टुकडे गँगची लीडर बनली आहे. मी नेहरुंचा उल्लेख करत नाही अशी तुमची तक्रार असते ना, आज असं होणार नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला आहे.

दरम्यान, स्वतः अपयशानं निराश आहेत, त्यामुळे देशातल्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून पाहतात, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भाजप खासदाराला आला मुलीचा ‘न्यूड व्हिडीओ काॅल’ अन्…

 निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!

“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं

 ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं