पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर प्रोफाईलचा फोटो बदलला, ठेवला मास्क लावलेला फोटो

नवी दिल्ली |  भातावरचं कोरोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. लॉकडाऊन असून देखील रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल पिक्चर(फोटो) बदलला आहे. मास्क लावलेला फोटो त्यांनी आता आपला प्रोफाईलला लावला आहे.

मास्क लावलेला प्रोफाईल फोटो ठेवून त्यांनी त्यामाध्यमातून नागरिकांना देखील मास्क लावण्याचा आग्रह केला आहे. आपल्या संबोधनात देखील त्यांनी मास्क लावण्याचा आग्रह त्यांनी देशावियांना केला.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा. कोरोनाच्या लढाईत मास्क अत्यंत महत्वाची जबाबदारी पेलणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मास्क लावा, असं मोदी आपल्या संबोधनात म्हणाले.

दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून नरेंद्र मोदींचा एकच फोटो प्रोफाईलला होता. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला प्रोफाईल बदलत संकट गडद असताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन

-अन्य देशांच्या तुलनेत भारतात ३० टक्के केसेस कमी आहेत – नरेंद्र मोदी

-पंतप्रधानांची मोठी घोषणा; देशामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊन

-‘काँग्रेस हा विना शीर आणि पायांचा पक्ष’; या अभिनेत्याची बोचरी टीका

-धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल