ओम आणि गाय शब्द ऐकल्यावर काही लोकांच्या अंगावर काटा फुटतो; मोदींची विरोधकांवर टीका

मथूरा |  या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की ‘ओम आणि गाय’ हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो, असं म्हणत मथुरेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

विरोधकांना ओम आणि गाय हे शब्द कानावर पडल्यावर देश पुन्हा 16 व्या शतकात गेल्यासारख वाटतं. असं ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केलं आहे आहे, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरेचा दौरा केला. मोदी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजनासह शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा करत प्लास्टिक मुक्त भारतासह ‘जय किसान’चा नारा दिला.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच कृष्णाच्या नगरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. जनादेश मिळाल्यानंतर सरकारने तुमच्या अपेक्षेप्रमाणेच अभूतपूर्व काम करून दाखवले आहे. देशाच्या विकासासाठी तुमचे समर्थन सदैव मिळत राहिल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

आज संपूर्ण विश्व पर्यावरण संरक्षणासाठी रोल मॉडलचा शोध घेत आहे. पण, भारताकडे भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्त्रोत आहे. ज्यांच्याशिवाय पर्यावरण प्रेमाची कल्पनाच अपूर्ण आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-