देश

21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर सलग पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिली.

नरेंद्र मोदींनी आता या पॅकेजची आणि केलेल्या उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी पाच जणांची टीम तयार केल्याची माहिती आहे.

मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर एक अनौपचारिक मंत्रिगट लक्ष ठेवणार आहे. त्याचं नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. तर या मंत्रिगटात गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी उड्डयण मंत्री हरदीप पुरी यांचा समावेश आहे.

दरम्यान, सलग पाच दिवस अर्थमंत्री सीतारामन यांनी नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

-कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

-तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला

-… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप