मोदींनी पी. चिदंबरम यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

१६ सप्टेंबर रोजी चिदंबरम यांचा वाढदिवस होता. मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं होतं. हे पत्र चिदंबरम यांनी ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिदंबरम यांना शुभेच्छा देताना, लोकांची सेवा करण्यासाठी भगवान आपल्याला चांगलं स्वास्थ्य आणि आरोग्य देवो, अशी प्रार्थना केली आहे.

मला लोकांची सेवा करायची आहे, मात्र तपास यंत्रणांनी मला जखडून ठेवलं आहे. जसंही हे सर्व थांबेल तसं मी लोकांमध्ये जाईन, ज्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही आणि मी दोघे कटीबद्ध आहोत, असं चिदंबरम यांनी म्हटलंय.

दरम्यान, पी. चिदंबरम यांनी मोदींनी दिलेल्या शुभेच्छांवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-