नरेंद्र मोदींनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे- शशी थरूर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केलं आहे. मोदींची प्रतिमा खलनायकाची करणं योग्य नसल्याचं दोन काँग्रेस नेत्यांनी म्हटल्यानंतर आता थरूर यांनीही मोदींच कौतुक केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. 

नरेंद्र मोदी चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं मी गेल्या सहा वर्षांपासून बोलत असल्याचं तुम्ही पाहतच आहात. त्यांनी चुकी केली तर आमच्या टीकेला विश्वासार्हता प्राप्त होईल. माझ्या या मताशी विरोधी पक्षाचे अन्य नेतेही सहमत होत असल्याबद्दल मी त्यांचं आभारच मानतो, असं एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींचा वारंवार खलनायक असा उल्लेख करून विरोधक त्यांचीच मदत करत आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी व्हिलन ठरवून त्यांच्यावर टीका करत राहिल्यानं काहीही हाती लागणार नाही, असा सल्ला जयराम रमेश यांनी दिला होता. 

नरेंद्र मोदी अशी कामं करत आहेत ज्याची जनतेकडून प्रशंसा होत आहे, अशी कामे याआधी झालेली नाहीत. जोपर्यंत हे आम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही, असंही रमेश म्हणाले आहेत.

shashi tharur tweet

महत्वाच्या बातम्या-