“नरेंद्र मोदी हे देवाचा अंश, सुपर ह्युमन”; मुख्यमंत्र्यांनी उधळली स्तुतीसुमने

पणजी | देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परिणामी विविध पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. अशात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं.

देशाच्या राजकारणात सध्या भाजप आणि काॅंग्रेसमधील सत्तासंघर्ष प्रचंड गाजत आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील वातावरण पेटलं आहे.

पाचपैकी सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. अशातच भाजपच्या हातातून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी आमदार असले तरी भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भाजपमधील आमदार आणि मंत्री सध्या विरोधी पक्षांमध्ये जात आहेत. अशात पंजाबमध्ये वेगळंच राजकारण पेटलं आहे.

गोव्यातील निवडणूक प्रचारामध्ये देखील नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धा लागल्याचं चित्र सध्या आहे.  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गोव्यात भाजपचा प्रचार करताना मोदींबद्दल बहारदार वक्तव्य केलं आहे.

नरेंद्र मोदी हे असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. नरेंद्र मोदी हे देवाचा एक अंश आहेत, असं वक्तव्य शिवराज चौहान यांनी केलं आहे. महर्षी अरविंद यांच्या सुपर ह्यूमन गृहितकांसह मोदींची स्तुती केली आहे. परिणामी चौहान यांचं वक्तव्य सध्या गाजत आहे.

प्रचारामध्ये विविध मुद्द्यांवर वक्तव्य केल्यानंतर चौहान यांनी पर्रिकर आणि मोदींनी गोव्याच्या विकासात मोठं योगदान दिल्याचं म्हटलं आहे. मोदींची स्तुती करण्याच्या नादात त्यांनी चक्क देवाशी तुलना केल्यानं वाद पेटला आहे.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांच्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ

BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’