मोदींच्या सुरक्षा प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘त्या’ ऑडिओमुळे देशभर एकच खळबळ

नवी दिल्ली | देशाच्या पंतप्रधानांना सर्वांत मोठी सुरक्षा पुरवली जाते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षेत मोठी चूक राहिल्यानं पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली होती.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजला होता. देशात सर्व ठिकाणी पंतप्रधानांच्या सुरक्षेची चर्चा सुरू होती. तर याच मुद्द्यावर राजकारण देखील तापलं होतं.

अशातच आता या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. निवृत्ती न्यायाधीशांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे.

अशातच सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना या प्रकरणात धमकीचा काॅल आला आहे. हा फोन युनाटेड किंगडम म्हणजेच युकेमधून आल्याची माहिती मिळाली आहे.

हा रेकाॅर्डेड काॅल असल्याचं देखील समोर आलं आह. वकिलांना अशा प्रकारचे दोन फोन आले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोदींच्या सुरक्षेच्या याचिकेपासून दूर रहावं, असा इशारा या फोनच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला ब्लॉक करण्याची जबाबदारी देखील शिख फॉर जस्टीस (Sikh For Justice) या खलिस्तान समर्थक संघटनेनं घेतली आहे. मोदी सरकारला मदत करू नका आणि शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका, असंही या संघटनेनं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 1984 साली झालेलं हत्याकांड आठवावं. तुम्ही एकाही हत्याऱ्याला पकडू शकत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मदत केली तर ते त्यांचे सर्वात वाईट काम असेल, अशी धमकी देखील देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या या ऑडिओ क्लिपबद्दल अधिकची माहिती पोलीस घेत आहेत. तर आता गुप्तहेर संघटना देखील या ऑडिओ क्लिपमुळे सतर्क झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट

कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”

 राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय