खेळ

भारताच्या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

modiii12

नवी दिल्ली | न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात भारताला अवघ्या 18 धावांनी पराभव झाला आणि तमाम भारतीयांची निराशा झाली. पंतप्रधान नरेेंद्र मोदीही या सामन्यावर लक्ष ठेवून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पराभवावर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निकाल निराशाजनक आहे, मात्र भारतीय संघानं शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून समाधान वाटलं. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेेत्ररक्षण उत्तम होतं. याचा अभिमान वाटतो. भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

न्युझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारता समोर 240 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र सुरूवातीलाच  भारतीय खेळाडू पटापट तंबूत परतत होते. पहिल्या 10 षटकांमध्ये 24 वर 4 बाद अशी अवस्था होती. 

सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा 18 धावांनी पराभव झाला आणि भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला.