देश

काँग्रेसची बेरोजगारी मी कधीच कमी होऊ देणार नाही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण केलं. त्यांनी आजच्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत काँग्रेसला जोरदार चिमटे काढले. भाजपच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या मिश्किल अंदाजाला बाकं वाजवून समर्थन दिलं.

एनडीएचं सरकार खूप कमी वेळात मोठं-मोठी पावलं उचलतंय. सरकारच्या प्रयत्नांनी महागाई आता नियंत्रणात आली आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी संसदेत काँग्रेस खासदारांनी गोंधळ घालत देशातली बेरोजगारी कमी करा, असं मोदींना म्हणाले. त्यावर मला बरं वाटतंय की तुम्हाला हा विश्वास आहे की मी बेरोजगारी कमी करेल. परंतू तुमची (काँग्रेसची) बेरोजगारी मी कधी कमी करणार नाही अन् करूही देणार नाही, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

काँग्रेसच्या मार्गावर आम्ही आज चालत असतो, तर अनेक वर्षानंतरही ही प्रगती झाली नसती. आमच्या सरकारमध्ये हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही देशासाठी अडचणीचे ठरणारे अनेक प्रश्न सोडवू शकलो. आमच्या सरकारने हिंमत दाखवून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं. काँग्रेसला हे कधीच जमलं नसतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी आज संसदेत तुफान फटकेबाजी करत राहुल गांधींना ‘ट्युबलाईट’ची उपमा दिली. तर काँग्रेसच्या लोकांची बेरोजगारी कधीही हटवणार नाही, असा टोमणाही मारला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”

-हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत!

-हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत!

-“बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”

-माझ्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवा; या सर्व मागण्या खोट्या आव्हाडांचं स्पष्टीकरण