मुंबई | आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात 0.17 टक्क्यांनी घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 47,832 रुपयांवर पोहोचले आहेत
चांदीच्या दरामध्ये देखील 0.14 टक्क्यांची घट झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,192 वर पोहोचले आहेत. सोने आणि चांदीच्या दरामध्ये अनुक्रमे 82 आणि 78 रुपयांची घट झाली आहे.
सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर चांदीच्या दरात 0.27 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे सोने 48000 हजारांवर पोहोचले होते. आज त्यामध्ये घट होऊन, सोन्याचे दर 47,832 पर्यंत खाली आले आहेत.
मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर वारंवार बदलत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सोने प्रति ग्रॅम 56 हजारांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दराला घसरण लागली.
या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात सोने 45 हजारांच्या देखील खाली आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हळूहळू सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे.
सोन्याचे दर अस्थिर असल्याने अनेक गुंतवणुकदार सोन्यामधील आपली गुंतवणूक काढून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवताना दिसत आहेत.
फेब्रुवारी 2022 च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.05 टक्क्यांनी घसरून 47,890 रुपये प्रति तोळावर आहे. त्याच वेळी, आजच्या व्यवहारात चांदी 0.8 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,221 रुपये आहे.
दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा
“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत”
‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका