उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं- नरेंद्र मोदी

मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) आणि जवळपास अडीच हजार जावई लाभलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं आज दु:खद निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्या जाण्यानं हजारो त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलं चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनाने अपार दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.

‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा 

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार

महाराष्ट्र पोरका झाला! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

“जितेंद्र आव्हाडांविरोधात अॅट्राॅसिटी दाखल करा”; सदावर्तेंची आक्रमक मागणी

वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भीक नहीं अधिकार चाहिये…”