मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) परीक्षेच्या तयारीच्या पद्धती, तणावमुक्ती यासह विविध विषयांवर देसभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. ‘परीक्षा की बात, पीएम के साथ’या मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
तुम्ही अनेकवेळा परीक्षी दिली आहे. तुम्ही मनात ठरवा की परीक्षा (examination) ही जीवनाचा एक सहज भाग आहे. विकास यात्रेचा एक टप्पा आहे. त्यातून जायचं आहे आणि आपण गेलो आहोत. आपण एवढ्या परीक्षा दिल्या आहेत की एक्झाम प्रूफ झालो आहोत. त्यामुळे आपण एक्झाम प्रुफ झालो असं समजूनच परीक्षा द्या, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.
परीक्षेचे हे अनुभव हीच आपली शक्ती असते. तो अनुभव लहान मानू नका. तुमच्या मनात जे पॅनिक होतं. त्यातून तुम्ही तयारी करण्यास कमी पडलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. माझा सल्ला आहे. हे ओझं घेऊन जायचं आहे. जे केलं आहे त्याला विश्वासाने पुढे न्यायचं आहे, असं मोदी म्हणाले.
एखाद्या गोष्टीत मेहनत कमी पडली असेल तर त्यात एवढं काय घाबरून जायचं? इतर गोष्टीत माझा आत्मविश्वास असेल तर बाकीच्या गोष्टी पूर्ण होतात, असं ते म्हणालेत.
तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॅनिक क्रिएट होईल असं वातावरण करू नका. सहज दिनक्रम असू द्या, असं नरेंद्री मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत”
“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी”
मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले…
ग्राहकांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला
“यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल”