पंतप्रधानांचा परदेश दौऱ्यावरील खर्च कोटींच्या घरात; आकडा वाचून व्हाल थक्क

दिल्ली| गेल्या 5 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 446 कोटी 52 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.

याला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. 2015-16 या कालावधीत परदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च झाला आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

तर 2016-17 या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर 78.52 कोटी रूपये खर्च करण्यात आले. 2017-18 मध्ये त्यांच्या परदेश दौऱ्यावर 99.90 कोटी रूपये तर 2018-19 मध्ये 100.02 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. 2019-20 या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर 46.23 कोटी रूपये खर्च करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा केला होता. तर त्यानंतर त्यांचा अमेरिकेचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाला संबोधित केले होते.

महत्वाच्या बातम्या-

-इस्राईलच्या पंतप्रधानांनी कोरोनापासून वाचण्यासाठी ‘ही’ भारतीय पद्धत वापरण्याचा दिला सल्ला

-मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होंगे; जयंत पाटलांचा मुनगंटीवारांना टोला

-उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न येता मक्केला जावं; अयोध्येतील साधूंची टीका

-इटलीहून परतलेल्या राहूल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजप नेत्याचा सवाल

-“ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवायच राष्ट्रवादी निर्णय घेते?”