छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा

नवी दिल्ली | आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराजांची जयंतीची मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!, असं त्यांनी मराठीत ट्वीट केलं आहे.

भारत मातेच्या महान सुपुत्रांपैकी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. शौर्य, करुणा आणि उत्तम प्रशासक याचे मुर्तीमंत उदाहरण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाजारांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजही त्यांचे जीवनकार्य लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असं ट्विट मोदींनी केलं आहे. तसेच महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शूर योद्धा आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून आपली छाप पाडली. एक मजबूत आरमार उभं करण्यापासून ते लोकाभिमूख धोरणे आखण्यापर्यंत शिवाजी महाराज सर्व क्षेत्रात उत्कृष्ट होते. महाराज अन्याय आणि दहशत पसरवणाऱ्यांना विरोध करण्याच्या त्यांच्या भूमिकेसाठी नेहमीच स्मरणात राहील, असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-राकेश मारियांनी 26\11 हल्ल्यासंदर्भात केला ‘हा’ मोठा खुलासा!

-शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिला मानाचा मुजरा

-छत्रपती शिवरायांचे स्टेटस व्हिडीओ घालतायत सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ!

-…तर इंदोरीकरांच्या तोंडाला आश्रमात जाऊन काळं फासू- तृप्ती देसाई

-कियारा आडवाणीचा टॉपलेस फोटो होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल!