भाषण देताना अचानक टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने उडाला नरेंद्र मोदींचा गोंधळ, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात भाषण देत होते. या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लाटेचाही उल्लेख केला. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग भाषण करत असतात, त्यांच्या भाषणाची तारीफही होत असते. मात्र यावेळी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे ते बोलत असताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

नरेंद्र मोदी बोलत होते आणि अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले. काय बोलायचं ते त्यांना सुचेना त्यामुळे ते स्क्रिनच्या उजवीकडेही पाहू लागले. गडबड उडालेल्या मोदींनी कानात हेडफोन लावून आपलं भाषण ऐकू येतं आहे का हे विचारून वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न करताना मोदी दिसलं.

या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगलेच गोंधळलेले दिसले. हेच सगळं असलेला साधारण मिनिटभराचा व्हिडीओ ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नाही, अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या क्लिपची खिल्ली उडवली आहे. इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या विरोधात ट्विट केलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या –

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला 

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”