नरेंद्र मोदींचा व्लादिमीर पुतिन यांना फोन, दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेनसोबतचा तणाव संवादानं सोडवण्याचं आवाहन केलं.

पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनसंदर्भातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. त्याचवेळी रशिया आणि नाटो गटांमधील मतभेद प्रामाणिक संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

हिंसाचार ताबडतोब थांबवण्याचं आवाहन करत पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना राजनैतिक संवाद आणि संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.

गुरुवारी पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांच्या आणि विशेषतः युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. त्यांनी रशियाला सांगितलं की, या नागरिकांना मायदेशी परत आणणं हे भारताचं प्राधान्य आहे.

लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना सांगितल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

PMO ने माहिती दिली की, दोन्ही नेत्यांनी मान्य केलं आहे की त्यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी पथके या मुद्द्यांवर नियमित संपर्क ठेवतील.

दरम्यान, भारतातील यूक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात भारताने हस्तक्षेक करावा अशी मागणी केली आहे.

यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करावी असा आग्रह धरलाय. पोलिखा म्हणाले की, ‘सध्या यूक्रेनची अवस्था पाहता भारताने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. भारत आता एक पॉवरफूल ग्लोबल प्लेयर आहे. त्यामुळे भारताने अन्य मोठ्या देशांप्रमाणे या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक आहेत. जगातील सर्वच देशांचे नेते त्यांचा पूर्ण सन्मान करतात. भारत आणि रशियाचेही मैत्रिपूर्ण संबंध आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

कॉमेडियन ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष; पुतिन यांना भिडणारा पठ्ठ्या सैन्यासह स्वत: रणांगणात

शिवसैनिकाची मास्कमुळे झाली मोठी फजिती; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ 

जडेजाला लागलं पुष्पाचं याड! फलंदाजाला तंबुत धाडल्यावर म्हणाला, “मै झुकेगा नहीं”; पाहा व्हिडीओ 

महाराष्ट्राला हादरवलेल्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर