‘चांद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा पत्ता लागला!

बंगळुरू | भारताच्या महात्वाकांशी चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्यात ‘नासा’च्या उपग्रहाला यश आलं आहे. ‘नासा’च्या ल्युनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर कॅमेराने ‘विक्रम लँडर’च्या खाणाखुणा टिपल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय वेळेनुसार रात्री एक वाजून 53 मिनिटांनी ‘नासा’च्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो ट्वीट करण्यात आले असून त्यावर हिरव्या आणि निळ्या रंगाचे ठिपके दिसत आहेत. हिरवे ठिपके म्हणजे ‘डेब्रीज’, तर निळे म्हणजे ‘सॉईल डिस्टर्बन्स’ आहे.

सात सप्टेंबर 2019 रोजी ‘इस्रो’कडून  ‘चांद्रयान 2’ पाठवण्यात आलं होतं. मात्र चंद्रापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असताना विक्रम लँडरशी ‘इस्रो’चा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरने विक्रमच्या संभाव्य ठावठिकाण्याचे फोटो ‘इस्रो’ला पाठवले होते.

दरम्यान, चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-