तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे; ‘नासा’कडून ‘इस्रो’वर शब्दफुलांची उधळण!

नवी दिल्ली |  चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, अशी शब्दफुलांची उधळण करत नासाने इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. तसेच येत्या काळात सोबत काम करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

अंतराळात शोधकार्य कठीण आहे… चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 मोहिमेची लँडिंग करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांची आम्ही कौतुक करतो… तुम्ही तुमच्या प्रवासाने आम्हाला प्रेरणा दिली आहे… आपण भविष्यात सौर मंडळात शोध घेण्यासाठी संयुक्तपणे काम करु अशी अपेक्षा आहे, असं नासाने म्हटलं आहे.

वैज्ञानिकांचा चांद्रयान महत्वाकांक्षी प्रयोग थोडक्यासाठी अपयशी ठरला. त्यामुळे भारतीयांचा हिरमोड झाला खरा पण इस्त्रोच्या या प्रयत्नाचं संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात आलं.

दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे पडले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या-