इरफान खानच्या मृत्यूबाबत नसीरूद्दीन शाह यांचा मोठा खुलासा!

मुंबई | अभिनेता इफान खान याचं एप्रिल 2020 मध्ये निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. आता  ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी इरफान खानच्या आठवणींना उजाळा दिलाय.

नसीरुद्दीन शाह यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इरफान खानच्या आठवणी सांगत एक खुलास केला आहे.इरफान खान यांना त्यांच्या मृत्यूची माहिती काही वर्षांपूर्वीच मिळाली होती. हे फार विचित्र होतं, असं नसीरूद्दीन शाह यांनी सांगितलं आहे.

इरफान खान यांना दोन वर्षांपूर्वीपासूनच माहिती होतं की त्यांचं निधन होणार आहे. मी अनेकदा ते लंडनच्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या फोनवर बोलायचो, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

इरफान खानला त्याचा मृत्यू जवळ येत असल्याचा अनुभव येत होता. माझे मरण येत असल्याचे मला दिसत आहे. ही अशी संधी किती जणांना मिळते, असं ते म्हणाले.

मृत्यू तुमच्या समोर येऊन उभा असतो आणि तुम्ही त्याचे जवळजवळ स्वागतच करत असता. अर्थात हे मोठं नुकसान होतं. पण ते आपल्या हातात नव्हते. यात फक्त तुमची शारिरिक यंत्रणा बंद पडली होती. ज्यावर तुम्ही नियंत्रण करु शकत नाही, असं नसीरूद्दीन शाहा यांनी म्हटलंय.

दरम्यान, 29 एप्रिलला सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. 54 व्या इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा 

“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत” 

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत 

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका 

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर!