पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!

नाशिक | कोरोनामुळे महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, ज्यांना बेड मिळत आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. ज्यांना ऑक्सिजन मिळतो त्यांचं चांगल्या उपचारांअभावी नि.धन होत आहे. महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेच्या अशा परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. एका घरातील दोन दोन तीन तीन माणसं मृ.त्यु.मुखी पडली आहेत, घरातील कर्त्या व्यक्तींचं नि.धन झालं आहे. मात्र सरकारचे अजूनही डोळे उघडायला तयार नाहीत. सरकार कमी पडतंय आणि कोरोनामुळे वडील गमावणाऱ्या मुलीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून नेमकं तेच दाखवून दिलंय.

रश्मी पवार असं या मुलीचं नाव आहे. रश्मीनं आपल्या वडिलांच्या मृ.त्यूनंतर एक व्हिडीओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. रश्मीचा हा व्हिडीओ प्रशासन, महापालिका आणि सर्व सरकारी दाव्यांची पोलखोल करणारा आहे.

बाबांना वेळेत आय.सी.यू बेड मिळाला असता, तर ते आज आमच्यात असते. कोरोना रुग्णांची देखभाल करायला पुरेशी रुग्णालये उपलब्ध असल्याचे दावे केले जातात, मात्र कुठे आहेत ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णालयं? सर्वसामान्यांना का करावी लागतेय एक आ.य.सीयू बेड मिळवण्यासाठी पिरपिर? याच्या अगदी उलट सेलिब्रेटी तसेच राजकारण्यांना कसे काय लगेच अद्ययावत रुग्णालयात बेड उपलब्ध होत आहेत? असे सवाल रश्मीनं या व्हिडीओच्या माध्यमातून विचारले आहेत.

रश्मीचे वडील एका फार्मा कंपनीत कामाला होते. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने त्यांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेही त्यांना कुणी कळवलं नाही तर आरोग्य सेतू अॅपवरुन कळलं. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयातच न्यावं लागणार होतं. त्यासाठी ऑक्सिजनची सोय असलेल्या रुग्णालयाची गरज होती. त्यामुळे पवार कुटुंबाने अशा रुग्णालयाचा शोध सुरु केला.

एका नामांकित रुग्णालयाने आमच्याकडे आय.सी.यू बेड उपलब्ध आहे, असं त्यांना सांगितलं आणि वाट पहायला लावली. धक्कादायक बाब म्हणजे नंतर या रुग्णालयाने आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं. इतर रुग्णालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता “पेशंटसाठी बेड शोधून देणं हे आमचं काम नाही. तुमचं तुम्ही बघा”, असं या कुटुंबाला सांगण्यात आलं.

अखेर खूप सारे प्रयत्न केल्यानंतर रश्मीच्या वडिलांना एका रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला, मात्र आणखी धक्कादायक बाब अशी की रुग्णाला आवश्यकता असलेली ऑक्सिजन लेव्हल ठेवण्याएवढी क्षमता त्या रुग्णालयात नव्हती. मग पवार कुटुंबाने पुन्हा चांगल्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी वणवण सुरू केली, अशा अवस्थेतच रश्मीचे वडील अखेर रुग्णालयात दाखल झाले, पण २१ दिवस कोरोनाविरुद्ध लढल्यानंतर त्यांची प्रा.णज्योत अखेर मा.लवली.

श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या, आपला जी.व धो.क्यात असलेल्या एका रुग्णाला एक बेड मिळवण्यासाठी कशी धडपड करावी लागते, याचा अंगावर काटा आणणारा अनुभव रश्मीनं व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात?, असा संतप्त सवाल देखील तीने या व्हिडीओतून विचारला आहे. घरी उपचार शक्य असणारेही रुग्णालयातली जागा अडवतात आणि त्यामुळे खरी गरज असणाऱ्या सर्वसामान्यांना प्रा.णाला मुकावं लागतं, असं रश्मीने म्हटलं आहे.

‘बाबांना वेळेत आय.सी.यू बेड मिळाला असता, तर आज ते आमच्यात असते. आम्ही आमचा बाप ग.मावला. ही वेळ कुणावरही येऊ शकते’, असं म्हणत रश्मीने महाराष्ट्रातल्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणाऱ्या तसेच सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. सरकारी दावे कसे फोल आहेत आणि आपल्या प्रत्येकापुढं काय वाढून ठेवलंय, या कल्पनेनं अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

पाहा रश्मीचा संपूर्ण व्हिडीओ-