नाशिक महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्याच्या शाळांमध्ये वीजेची तक्रार; शिक्षणमंत्र्यांचे कार्यवाही करण्याचे आदेश

नाशिक |  नाशिक जिह्यातील काही शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अंधारकोठडीत शिक्षण घ्यावं लागतंय, ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित झाली होती. या बातमीची गंभीर देखील घेत त्यानंतर महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर फोनद्वारे चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळेची इमारत बांधून पूर्ण झालीये परंतू त्या शाळेमध्ये वीज पोहचलेली नाहीये. महावितरणकडून विविध कारणं सांगितली जातात तसंच उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. काही शाळांमध्ये वीज देखील पोहचली होती मात्र शाळेचं 1500 रूपये, 1800 रूपये वीजबील थकल्याने वीज कापण्यात आली आहे.

एवढ्यावरच न थांबता महावितरण कंपनीने शाळांचे मीटर देखील काढून घेतले आहेत. यावरच प्रसारमाध्यमांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी यावर बोलण्याचं टाळलं. मात्र त्यानंतर त्यांनी सारवासारव करत काम मार्गी लावण्यासंबंधी निर्णय घेतो, असं सांगितलं.

दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने नाशिकच्या अंधारकोठडीतल्या शाळांमध्ये आता तरी वीज येईल अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून आता इंदुरीकर महाराज ‘बाऊन्सर’ घेवून फिरणार!

-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!

-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ

-‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ