विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…

नाशिक | नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी वाढल्याने शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश काल दिले होते. मात्र दुकानचालकांकडून हमी घेऊन सर्व नियमांच्या अटीवर दुकानं उघडण्याची परवानगी देऊ, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये प्रत्येक वाईन शॉप दुकानदाराकडून हमीपत्र घेणार, आहे. तसंच सर्व नियम पाळण्याची हमी आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

मी लोकांना देखईल सांगू इच्छितो बेशिस्त राहिलात तर दुकानं सुरु होणार नाहीत, नियम पाळायला हवेत, कधी ना कधी दुकानं सुरु होणारच आहेत, कोणी आज करेल कोणी उद्या, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

आज ना उद्या सुरु होणारच आहेत. फक्त नियम पाळावे लागणार आहेत. अनेक जिल्ह्यात सुरु झाले आणि बंदही झाले. मात्र ही दुकानं कधी ना कधी सुरु होणारच आहेत. या अटी शर्ती यापुढे लागू राहतील, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन

-परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत

-तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!

-परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

-…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन