मुंबई | देशात जात, धर्म, पंत, भाषा, वेशभुषा यावरून अनेकदा मोठा वाद उभा राहीला आहे. परिणामी धार्मिक तेढ निर्माण व्हायला वेळ लागत नाही. अशातच आता प्रसिद्ध अभिनेते नसिरूद्दीन शहा यांनी एक वक्तव्य केलं आहे.
नसिरूद्दीन शहा यांना सिनेजगतात त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल जातं. त्यांनी अनेकदा देशातील धार्मिक घटनांवर प्रकाश टाकणार वक्तव्य केलं आहे.
काही दिवसांपुर्वी जहाल विचारांच्या लोकांनी आणि संघटनांनी मुस्लीम लोकांची हत्या करण्याची धमकी दिली होती. यावर भडकलेल्या शहांनी त्या लोकांना आणि संघटनांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
मला आता लोकांवर विश्वासच राहीला नाही. कारण म्हणजे लोक काय विचार करतील हे सांगता नाही येत. परिणामी आता काळजीपुर्वक बोलायची गरज आली आहे.
अनेकांना या देशात धर्माच्या नावावर युद्ध हवं आहे. या देशात सध्या असलेली शांतता काही लोकांना आवडत नाही. काही करून वातावरण दुषित कसं होईल याचा विचार काही लोक करत आहेत, असं शहा म्हणाले आहेत.
या देशामध्ये आम्ही 20 कोटी मुस्लीम आहोत. आम्ही सगळे भारताचे आहोत भारतीय आहोत. जर कोणी विनाकारण त्रास दिला तर त्यांच्याबद्दल आता मी काय बोलावं, असंही शहा म्हणाले आहेत.
माथेफिरू आपल्याला भडकवतात अशावेळी संयम ही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्ही या देशाचे आहोत हे ऐकूनही आम्हाला त्रास देत असतील तर आम्हीही त्यांचा लढून सामना करू, असं शहा म्हणाले आहेत.
दरम्यान, नसिरूद्दीन शहा यांनी आपली आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आहे. परिणामी सध्या शहा यांच्या या वक्तव्यांची चर्चा सर्वत्र होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”
“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”
दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध