“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…”

मुंबई |  प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच केंद्रावर देखील निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी सध्या देशात होत असलेल्या ईडी सीबीआयच्या कारवायांवर देखील भाष्य केलं.

शाहरुख खानसोबत जे झालं आणि ज्या पद्दतीने तो सामोरं गेला ते वाखाणण्याजोगं होतं. त्याने फक्त तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. सोनू सूदवरही धाड टाकण्यात आली. जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला उत्तर दिलं जात आहे. कदाचित यानंतर माझा क्रमांक असेल. पण त्यांना काही मिळणार नाही, असं ते म्हणाले.

भाजपने अखेर प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित (Nupur Sharma Suspended) केलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी नुपूरला पक्षाने निलंबित केलं आहे. या प्रकरणावरही शाह यांनी भाष्य केलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झालेली असून आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकणावर बॉलिवूडमधील कोणी बोललं नाही यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते ज्या स्थितीत आहे तिथे सध्या मी नाही. पण मला वाटतं ते अशा स्थितीत आहेत जिथे त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार आहे. त्यांना यामध्ये फार जोखीम पत्करावी लागू शकते, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार 

“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे 

हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे 

“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची