नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आपल्या समोर येत आहे. अलीकडे एकनाथ खडसे भाजपमधीलच काही नेत्यांची नावं घेत त्यांच्यावर आरोप करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

अशातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडून कोठेही जाणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

नाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे ते अतिशय जेष्ठ नेते आहेत. नाथाभाऊ आमचे मार्गदर्शक देखील आहेत. यामुळे सर्वांचा हिरमोड होईल भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. मात्र, एकनाथ खडसे भाजप सोडणार का?, याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र, खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादीचा झेंडा अधिकृतपणे हाती घेतला नाही. दोन दिवसांपूर्वीच खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य होतं. खडसे खासगी कामानिमित्त जळगावमध्ये आले होते. यावेळी ते आपल्या निवासस्थानी असताना पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत मला काहीही बोलायचं नाही. नो कमेंट्स, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मुहूर्तावरही मिश्किल प्रतिक्रिया दिली होती.

मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत. ते सर्व मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनीच ठरवले आहेत. म्हणजे माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सर्व मुहूर्त तुमचेच, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी माध्यमांनी राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर

स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

काय सांगता! काहीच डाऊन पेमेंट न करता ‘ही’ गाडी खरेदी करता येणार

सचिन तेंडूलकर नंतर आता केएल राहुलनंही केला ‘तो’ विक्रम!

परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर