शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |  राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून होणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

महाविद्यालयाचं कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली पाहिजे, असा निर्णय आम्ही यापूर्वी घेतला होता. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवातही राष्ट्रगीतानं व्हायला हवी, असंही आमचं म्हणणं होतं.

याबाबतचा आदेश 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने देणार आहोत. याबाबतचं परिपत्रक 19 तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये देण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलंय.

दरम्यान, खुल्या विद्यापीठांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घ्यायची असा निर्णय आज आम्ही दिला, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे

महत्त्वाच्या बातम्या-

-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??- बच्चू कडू

-निवडणूक आयोगाचा मनसेला दणका; धाडली राज ठाकरेंना नोटीस

-जनता जे करते, ते योग्यच असतं; दिल्लीच्या निकालावर प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

-साकळाईसाठी खा. सुजय विखेंनी घेतली जयंत पाटलांची भेट